esakal | कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ; तिसऱ्या लाटेची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates

गेल्या २४ तासात देशात कोरोना रुग्णांमध्ये १२.२ टक्के वाढ झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ; तिसऱ्या लाटेची भीती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोना रुग्णांमध्ये १२.२ टक्के वाढ झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहितीनुसार, देशात गुरुवारी ४७ हजार ९२ नवे रुग्ण आढळले. त्याआधी बुधवारी ४१ हजार ९६५ रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या २४ तासात ५०९ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग केरळमध्ये सर्वाधिक आहे. गुरुवारी राज्यात ३२ हजार ८०३ रुग्ण सापडले. तसंच २४ तासात १७३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात गुरुवारी सापडलेल्या रुग्णांपैकी एकट्या केरळमध्ये ६९.६५ टक्के रुग्ण आहेत.

देशात सक्रीय रुग्णांची संख्या ३ लाख ८९ हजार ५८३ इतकी आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १.१९ टक्के इतकं आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांचे प्रमाण हे ९७.४८ टक्के इतकं आहे. देशात गेल्या २४ तासात ३५ हजार १८१ लोक कोरोनामुक्त झाले. यामुळे एकूण कोरोनामुक्तांची संख्या ३ कोटी २० लाख २८ हजार ८२५ इतकी झाली आहे.

हेही वाचा: शरीरातील अवयव गुन्हेगार नसतात; केरळ उच्च न्यायालयाचे मत

गेल्या दोन महिन्यांपासून देशातील पॉझिटिव्हिटी रेट हा ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या ६९ दिवसांमध्ये हा दर २.६२ टक्के इतका आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा २.८० टक्के इतका नोंद झाला आहे.

देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटी २८ लाख ५७ हजार ९३७ इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या ४ लाख ३९ हजार ५२९ वर पोहोचली आहे. सध्या देशात लसीकरण मोहिमसुद्धा वेगाने सुरु केली जात आहे. गेल्या २४ तासात ८१ लाख ९ हजार २४४ डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत ६६ कोटी ३० लाख ३७ हजार ३३४ डोस देण्यात आल्याची माहिती केंद्राने दिली आहे.

loading image
go to top