corona
corona

भारतात कोरोनाचा कहर; केंद्र सरकारची 12 राज्यांना पंचसूत्री

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक अशी आहे. यामुळे केंद्र सरकारने राज्यांना सातत्यानं खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. दर दिवशी वाढणाऱ्या नव्या रुग्ण संख्येनं सरकारची चिंता वाढवली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी 12 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसोबत एक उच्च स्तरीय बैठक घेतली. यात कोरोनाला रोखण्यासाठी राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना कठोर उपाय आणि निर्बंध लागू करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तमिळनाडु, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यामध्ये पाच मुद्यांवर भर देऊन रणनिती तायर करण्यास सांगण्यात आली आहे. यामध्ये कोरोना चाचणीत वाढ, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, आयसोलेशन, लसीकरण आणि क्लिनिकल ट्रीटमेंटचा समावेश आहे. 

राज्यंसह केंद्रशासित प्रदेशातील 46 जिल्ह्यांमध्ये जवळपास 71 टक्के रुग्ण आहेत. तर 69 टक्के मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. भूषण यांनी सांगितलं की, सध्याच्या परिस्थितीत या जिल्ह्यांवर लक्ष देण्याची गरज आहे. मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल याकडे लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नव्याने करण्यात आलेल्या प्रयत्नांमध्ये राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना चाचण्या वाढवाव्या लागतील. 

ज्या राज्यात आरटीपीसीआर च्या चाचण्यांच प्रमाण कमी आहे तिथं 70 टक्क्यांपेक्षा जास्त चाचण्या होण्याची गरज आहे. एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करण्यात यावी. त्यांना आयसोलेट करण्यात यावं. 72 तासांच्या आत संपर्कात आलेल्या किमान 80 टक्के लोकांची ओळख पटवून त्यांना विलगीकरणात ठेवलं पाहिजे असंही भूषण यांनी सांगितलं. देशात कोरोनामुले आतापर्यंत जितके मृत्यू झाले आहेत त्यामध्ये 90 टक्के रुग्ण हे 45 वर्षांवरील आहेत.

राज्यांनी कोरोना नियमावलीचं पालन काटेकोरपणे होईल याकडे लक्ष द्यायला हवं. विशेषत; बाजार, बस स्टँड, शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन या गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमावलीचं कडक पालन व्हायला हवं. यासह होळी आणि इतर सण समारंभ हे घरापुरतेच मर्यादित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, केरळ, छत्तीसगढ आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत लग्नसमारंभात 100 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात रविवारी 40 हजार 414 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच 17 हजार 874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 23 लाख 32 हजार 453 रुग्ण बरे झाले. राज्यात सध्या 3 लाख 25 हजार 901 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com