esakal | रेकॉर्ड ब्रेक वाढ! यंदाच्या वर्षात एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

रेकॉर्ड ब्रेक वाढ! यंदाच्या वर्षात एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद

महाराष्ट्र, पंजाब आणि मध्यप्रदेशसारख्या राज्यातून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.

रेकॉर्ड ब्रेक वाढ! यंदाच्या वर्षात एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

विविध निर्बंध लावले असतानाही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक नवे रेकॉर्ड तयार करत आहे. भारतात रविवारी कोरोना महामारीनं आणखीन एक रेकॉर्ड गाठला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार,  भारतात एका दिवसांत ६२ हजार ७१४ नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ कोटी १९ लाख ७१ हजार ६२४ वर पोहचलीय. कोरोना संक्रमणामुळे गेल्या २४ तासांत ३१२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर कोरोना महामारीमुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींची संख्या १ लाख ६१ हजार ५५२  वर पोहचलीय. 

महाराष्ट्र, पंजाब आणि मध्यप्रदेशसारख्या राज्यातून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. नवीन कोरोना रुग्णांपैकी जवळपास ५० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्राताली आरोग्य मत्रालयानं शनिवारी रात्री दिलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत राज्यात ३३ हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे नाराजी व्यक्त केली आहे.  

हेही वाचा : आंदोलक शेतकऱ्यांचा भाजप आमदारावर हल्ला; अंगाला काळं फासत कपडेही फाडले

गेल्या २४ तासांत २८ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात एक कोटी १३ लाख २३ हजार ७६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या  चार लाख ८६ हजार ३१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

loading image
go to top