नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट; पण मृतांची संख्या वाढली

Corona Patient
Corona PatientANI
Summary

देशात नव्या रुग्णांची संख्या कमी होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

नवी दिल्ली - भारतातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट दिलासादायक आहे. मात्र दुसऱ्या बाजुला मृतांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या २४ तासात देशात नव्या रुग्णांमध्ये ३.४ टक्के घट झाली आहे. दिवसभरात देशात १ लाख ६१ हजार ३८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २४ तासात कोरोनामुळे १ हजार ७३३ जणांनी प्राण गमावले आहेत.

नव्या रुग्णांची संख्या कमी होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासात देशातील २ लाख ८१ हजार १०९ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या १६ लाख २१ हजार ६०३ इतकी आहे. तर आतापर्यंत ३ कोटी ९५ लाख ११ हजार ३०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Corona Patient
5 वर्षांपेक्षा कमी वयोगटाला लसीसाठी फायजरने मागितली परवानगी

पॉझिटिव्हीटी रेटमध्येही घट झाली असून सध्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ९.२६ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासातील १७३३ मृतांसह कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या ४ लाख ९७ हजार ९७५ इतकी झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com