esakal | दिलासादायक! देशात नव्या रुग्णांच्या संख्येत घट, कोरोनामुक्त वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

Corona patients

देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरु असून आतापर्यंत ७४ कोटी ३८ लाख ३७ हजार ६४३ डोस देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासात ५३ लाख ३८ हजार ९४५ जणांना लस देण्यात आली आहे.

दिलासादायक! देशात नव्या रुग्णांच्या संख्येत घट, कोरोनामुक्त वाढले

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशातील कोरोना बाधितांची संख्या आता कमी होताना दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यात केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. केरळमध्ये ओणमनंतर रुग्ण वाढले होते. त्यामुळे आता महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

दरम्यान, देशात रविवारी दिवसभरात २७ हजार २५४ नवे रुग्ण आढळले असून २१९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३२ लाख ६४ हजार १७५ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ३ लाख ७४ हजार २६९ सक्रीय रुग्ण आहेत. तर ३ कोटी २४ लाख ४७ हजार ३२ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. भारतात कोरोनामुळे ४ लाख ४२ हजार ८७४ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्रिपद हुकल्यानं नितिन पटेल नाराज; म्हणाले, 'मी काही एकटाच...'

देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरु असून आतापर्यंत ७४ कोटी ३८ लाख ३७ हजार ६४३ डोस देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासात ५३ लाख ३८ हजार ९४५ जणांना लस देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात रविवारी ३ हजार ६२३ नवीन रुग्ण आढळले तर ४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात एकूण ६४ लाख ९७ हजार ८७७ जणांना कोरोनाची लागण झाली तर १ लाख ३८ हजार १४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ५ हजार ७८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.१२ टक्के इतका असून रिकव्हरी रेट ९७.०४ टक्के इतका आहे.

loading image
go to top