देशात २४ तासात १ लाख ९४ हजार नवे रुग्ण; ४४२ जणांचा मृत्यू

Corona
Coronasakal
Summary

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत जवळपास १६ टक्के इतकी वाढ झाली.

दिल्ली - भारतात (India) कोरोना रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत जवळपास १६ टक्के इतकी वाढ झाली. गेल्या २४ तासात देशात १ लाख ९४ हजार ७२० नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात ६० हजार ४०५ जण कोरोनामुक्त होऊन परतले. ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून दर दिवशी ४०० ते ५०० ने भर पडत आहे. आतापर्यंत देशात एकूण ४ हजार ८६८ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले.

सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या ९ लाख ५५ हजार ३१९ इतकी आहे. काल दिवसभरात कोरोनामुळे ४४२ जणांचा मृत्यू झाला. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेटही ११.०५ टक्के इतका आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी देशात २६ हजार ६५७ नवे रुग्ण सापडले. सोमवारी दिवसभरात देशात १ लाख ६८ हजार ६३ रुग्णांची नोंद झाली होती.

Corona
कोरोना कमकुवत होतोय? ओमिक्रॉनमुळे सामान्य आजाराचं येणार रुप - EU

भारतात आतापर्यंत ३ कोटी ४६ लाख ३० हजार ५३६ जणांनी कोरोनावर ममात केली आहे. सध्या पुन्हा एकदा कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढत आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा ९.८२ टक्के इतका आहे. आतापर्यंत देशात ६९.५२ कोटी जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर लसीकरणाची मोहिम वेगाने सुरु आहे. यात आजपर्यंत १५३ कोटी ८० लाख ८ हजार २०० डोस देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासात ८५ लाख २६ हजार २४० जणांना डोस देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com