Corona : लसीकरणाचा टप्पा 75 लाखांच्या पार; 4 राज्यात एकही नवा रुग्ण नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 February 2021

भारत हा जगातील सर्वाधिक गतीने लसीकरणाची मोहिम राबवणारा देश ठरला आहे.

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 9,309 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,08,80,603 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 15,858 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्य रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,05,89,230 वर जाऊन पोहोचली आहे. भारतात गेल्या 24 तासांत 87 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही  1,55,447 वर पोहोचली आहे. सध्या देशात  1,35,926 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. भारतात आतापर्यंत 75,05,010 जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे. 

दादरानगर हवेली, दमन आणि दीव, लडाख, त्रिपूरा आणि अंदमान आणि निकोबारमध्ये गेल्या 24 तासांपासून एकही नवा रुग्ण आढळून आला नाहीये. 

भारत हा जगातील सर्वाधिक गतीने लसीकरणाची मोहिम राबवणारा देश ठरला आहे. आतापर्यंत भारतात 75 लाख जणांना लस दिली गेली आहे. याबाबत जगाच्या पातळीवर भारताची वेगवान घोडदौड दाखवणारा व्हिडीओ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केला आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात नवे 3,297 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ही 20,52,905 वर पोहोचली आहे. काल राज्यात 6,107 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 19,70,053 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 30,265 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. काल राज्यात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 51,415 वर पोहोचली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Report 12 February 2021