esakal | Corona Update : गेल्या 24 तासांत 163 रुग्णांचा मृत्यू; राज्यात 2,889 नवे कोरोना रुग्णा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

राज्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 19,23,187 वर पोहोचली आहे.

Corona Update : गेल्या 24 तासांत 163 रुग्णांचा मृत्यू; राज्यात 2,889 नवे कोरोना रुग्णा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात काल 18,855 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णासह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,07,20,048 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत भारतात 20,746 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,03,94,352 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,54,010 वर पोहोचली आहे. सध्या देशात 1,71,686 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. आतापर्यंत भारतात लसीकरण सुरु झाल्यानंतर एकूण 29,28,053 लोकांना लस दिली गेली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

गेल्या 24 तासांत भारतात 7,42,306 चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना चाचण्यांची संख्या ही 19,50,81,079 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) ने दिली आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात 2,889 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 20,18,413 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 3,181 रुग्णांचा डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 19,23,187 वर पोहोचली आहे. काल राज्यात 50 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही  50,944 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 43,048 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत.
 

loading image
go to top