esakal | Corona Update : देशात 98 जणांचा मृत्यू; राज्यात काल 7,863 कोरोना बाधीत

बोलून बातमी शोधा

Corona Update}

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.89% झाले आहे.

desh
Corona Update : देशात 98 जणांचा मृत्यू; राज्यात काल 7,863 कोरोना बाधीत
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात काल 14,989 नवे रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत 13,123 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला असून 98 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.  

  • आजवरचे एकूण रुग्ण: 1,11,39,516
  • एकूण बरे झालेले रुग्ण: 1,08,12,044  
  • एकूण मृत्यू: 1,57,346
  • ऍक्टीव्ह रुग्ण: 1,70,126
  • एकूण लसीकरण: 1,56,20,749

राज्यात काल 7863 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच काल नवीन 6332 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2036790 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 79093 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.89% झाले आहे.