Corona Update : गेल्या 24 तासांत 17,824 रुग्णांना डिस्चार्ज; राज्यात 2992 नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत 12,899 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,07,90,183 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 17,824 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,04,80,455 वर जाऊन पोहोचली आहे. काल 107 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,54,703 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 1,55,025 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. भारतात 16 जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत 44,49,552 जणांना लस देण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

भारतात काल 7,42,841 चाचण्या करण्यात आल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 19,92,16,019 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) ने दिली आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात 2992 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 20,33,266 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 7030 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण आजवरच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 19,43,335 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 51,169 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 37,516 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Report 4 February 2021