Corona Update : गेल्या 24 तासांत 11,805 रुग्ण बरे;राज्यात काल 2,768 नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 February 2021

याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे नवे 12,059 सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,08,26,363 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 11,805 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,05,22,601 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या 1,54,996 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 1,48,766 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. भारतात आतापर्यंत 57,75,322 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

महाराष्ट्रात काल 2,768 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 20,41,398 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 1,739 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण आजवरच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 19,53,926 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 34,934 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. राज्यात काल 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण कोरोना मृतांची संख्या ही 51,280 वर जाऊन पोहोचली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Report 7 February 2021