Corona : गेल्या 24 तासांत 92 रुग्णांचा मृत्यू; राज्यात कोरोनाचे नवे 3,611 रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 February 2021

याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत 12,194 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,09,04,940 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 11,106 लोक बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,06,11,731 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 92 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,55,642 वर पोहोचली आहे. सध्या देशांत एकूण 1,37,567 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. भारतात आतापर्यंत 82,63,858 लोकांना लस दिली गेलीय. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

काल भारतात एकूण 6,97,114 कोरोना चाचण्या केल्या गेल्या. या नव्या चाचण्यांसह भारतातील एकूण चाचण्यांची संख्या ही 20,62,30,512 वर गेली आहे. याबाबतची माहिती ही Indian Council of Medical Research ने दिली आहे.

काल महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे नवे 3,611 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 20,60,186 वर पोहोचली आहे. काल राज्यात 1,773 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 19,74,248 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 51489 वर गेली आहे. सध्या राज्यात 33,269 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Report Marathi 14 February 2021