Corona Update : गेल्या 24 तासांत 18,645 कोरोनाचे नवे रुग्ण; 16 जानेवारीपासून देशात लसीकरण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

येत्या 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणास सुरवात होईल.

नवी दिल्ली : गेल्या जवळपास दहा महिन्यांपासून सगळ्यांच्या चिंतेचा विषय ठरलेल्या कोरोनावर आता लस तयार झाली असून, ती सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कामही सुरू झाले आहे. ब्रिटनसह युरोपातील आणि पश्चिमेतील इतर देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आता भारतातही लसीकरणाला सुरुवात होणार आहे. येत्या 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणास सुरवात होईल.

हेही वाचा - कसा आणि कुठून आला बर्ड फ्लू? भारतात काय आहे धोका?

भारतात गेल्या 24 तासांत 18,645 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 1,04,50,284 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 19,299 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,00,75,950 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 201 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरच्या एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या ही 1,50,999 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 2,23,335 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

गेल्या 24 तासांत देशात 8,43,307 चाचण्या केल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील एकूण चाचण्यांची संख्या ही 18,10,96,622 वर गेली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research ने दिली आहे.
काल महाराष्ट्रात एकूण 3581 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 19,65,556 वर जाऊन पोहोचली आहेत. राज्यात काल 2401 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,61,400 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण आजवरच्या मृतांची संख्या ही 50,027 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 52,960 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

भारतात 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण सुरू होणार आहे. सध्या भारतात लसीचा दुसऱ्या टप्प्यातील ड्राय रन सुरू असून, देशभरातील जिल्ह्यांमध्ये लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आता प्रत्यक्ष नागरिकांना लस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. येत्या 16 जानेवारीपासून एकाच वेळी देशभरात लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल. त्यात डॉक्टर, नर्स यांच्यासह आरोग्य सेवक आणि सेविकांचा समावेश असणार आहे. या टप्प्यात 3 कोटी भारतीय लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्या बैठकीला पंतप्रधानांचे मुख्य सचिव, आरोग्य खात्याचे सचिव, कॅबिनेट सचिव उपस्थित होते.  पुढच्या टप्प्यात ज्येष्ठ नागरीक, महिला, गर्भवती स्त्रिया, पोलिस, यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update Marathi India 10 January 2021