Corona Update : गेल्या 24 तासांत 228 रुग्णांचा मृत्यू; राज्यातील मृतांची संख्या 49,970 वर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

काल एका दिवसात 9,16,951 चाचण्या केल्या गेल्या आहेत.

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे नवे 18,222 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 1,04,31,639 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 19,253 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,00,56,651 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 228 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या ही 1,50,798 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 2,24,190 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

काल एका दिवसात 9,16,951 चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवर केल्या गेलेल्या एकूण कोरोना चाचण्यांची संख्या ही 18,02,53,315 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research ने दिली आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात नव्या 3,693 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 19,61,975 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात एकूण 2,890 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,58,999 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात एकूण 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या 49,970 वर जाऊन पोहोचली आहे. राज्यात सध्या 51,838 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update Marathi Report India 9 January 2021