
आतापर्यंत देशात ५ हजार ७५३ जणांना कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनची लागण झाली आहे.
देशात 24 तासात 2.64 लाख नवे रुग्ण; 315 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली - भारतात सलग दुसऱ्यादिवशी कोरोनाच्या (Corona) नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज ६.७ टक्के रुग्ण वाढले आहेत. देशात गेल्या २४ तासात २ लाख ६४ हजार २०२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात १ लाख ९ हजार ३४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात (India) सक्रीय रुग्णांची संख्या १२ लाख ७२ हजार ७३ इतकी झाली आहे. (India Corona Update today)
दिवसेंदिवस दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेटही वाढत असून ही चिंतेची बाब आहे. आज दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा १४.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. काल तो ११ टक्क्यांवर होता. दुसऱ्या बाजुला ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशात ५ हजार ७५३ जणांना कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनची लागण झाली आहे.
हेही वाचा: अमेरिकेत गेल्या २४ तासात सर्वाधिक ६.७२ लाख रुग्ण
भारतात दिवसभरात कोरोनामुळे ३१५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण ४ लाख ८५ हजार ३५० जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
Web Title: Corona Update New Cases 2 Lakh 50 Thousand Positivity Rate Rise Omicron Near To 6 K
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..