अमेरिकेत गेल्या २४ तासात सर्वाधिक ६.७२ लाख रुग्ण | Corona Patient | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona patient
अमेरिकेत गेल्या २४ तासात सर्वाधिक ६.७२ लाख रुग्ण | Corona Patient

अमेरिकेत गेल्या २४ तासात सर्वाधिक ६.७२ लाख रुग्ण

वॉशिंग्टन : जगभरात गेल्या चोवीस तासात २७.७२ लाख नवीन बाधित आढळून आले असून ९.५५ लाख बरे झाले आहेत. जगात कोरोनामुळे चोवीस तासात ७८४७ जणांचा मृत्यू (Corona Death) झाला आहे. नवीन रुग्ण आढळून येण्याच्या बाबतीत अमेरिकेत सर्वाधिक ६.७२ लाख रुग्ण आढळून आले तर त्यापाठोपाठ फ्रान्समध्ये ३.६८ लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. (International Corona Updates)

जर्मनीत काल चोवीस तासात ८० हजार ४३० रुग्ण आढळून आले तर ३८४ जणांचा मृत्यू झाला. ही संख्या कोरोना संसर्ग पसरल्यानंतर प्रथमच सर्वाधिक नोंदली गेली आहे. यापूर्वी २५ नोव्हेंबर २०२१ रोजी ७६ हजार १३२ जणांना लागण झाली होती.

हेही वाचा: अपघातात मृत्यू झालेल्या झोमॅटो बॉयच्या पत्नीला कंपनीकडून नोकरी

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, येत्या ६ ते ८ आठवड्यात निम्म्या युरोपात ओमिक्रॉनचा फैलाव होऊ शकतो. त्याचा थेट परिणाम पश्‍चिम देशांकडून पूर्वेकडील देशांवर होईल. जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे संचालक हेन्स क्लग यांनी म्हटले की, २०२२ च्या पहिल्या आठवड्यात युरोपात ७ लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

ही संख्या गेल्या दोन आठवड्याच्या तुलनेत दुप्पट होती. कोरोना प्रतिबंधक लशीमुळे सद्यस्थितीत कोरोनाची लाट जीवघेणी ठरत नसल्याचे चित्र आहे. अर्थात या संसर्गाला सिझनल फ्लू म्हणून गृहित धरणे चूक ठरेल, असेही ते म्हणाले. नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. सायप्रसच्या शास्त्रज्ञाच्या मते, डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंट एकत्र येऊन नवीन स्ट्रेन लोकांत पसरत आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ सायप्रसच्या संशोधकांनी ‘डेल्टाक्रॉन’ असे नाव दिले आहे. प्रोफेसर कोस्त्रिकिस यांनी म्हटले की, डेल्टाक्रॉन हे ओमिक्रॉन आणि डेल्टाचे मिश्रण आहे.डेल्टा जीनोममध्ये ओमिक्रॉनसारखे जेनेटिक लक्षणे आढळून आले आहेत.

हेही वाचा: यूपीत 2017 च्या तुलनेत भाजपला मोठा विजय मिळेल - केशव प्रसाद मौर्य

चीनमध्ये कडक नियमांची अंमलबजावणी

कोरोना नियंत्रित करण्यासाठी चीनकडून कडक नियमांची अंमलबजावणी सुरू आहे. दोघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याने अनयांग या ५५ लाख लोकसंख्येच्या शहरात लॉकडाउन आहे. यापूर्वी १ कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या शीआन शहर आणि ११ लाख लोकसंख्या असलेल्या युझोऊ येथे लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. चीनमध्ये सध्या १.९६ कोटी लोकांना लॉकडाउनचा सामना करावा लागत आहे. चीनमध्ये पुढच्या महिन्यात विंटर ऑलिंपिक स्पर्धा होत असून त्याची तयारी सुरू आहे. यामुळे नागरिकांवर अधिकाधिक निर्बंध आणले जात आहेत. अनेक ठिकाणी लोकांजवळील जेवण्याचे सामानही संपले आहे. त्यामुळे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीची मागणी करताना दिसून येत आहेत.

जगभरात कोरोनाचा कहर

  • मध्य आशियायी देश किर्गिस्तान येथे ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण

  • यूनायटेड एअरलाइन्सच्या सुमारे ३ हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

  • चीनच्या तियानजीन शहरात १.४ कोटी नागरिकांची कोविड चाचणी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global newsCorona Patient
loading image
go to top