Corona : गेल्या 24 तासांत 100 रुग्णांचा मृत्यू; राज्यात 3663 नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 February 2021

याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 11,610 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,09,37,320 वर पोहोचली आहे. काल भारतात 11,833 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,06,44,858 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत भारतात 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही  1,55,913 वर पोहोचली आहे. सध्या देशातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 1,36,549 वर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत 89,99,230 जणांना लस दिली गेली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

भारतात काल 6,44,931 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. या नव्या टेस्टसह भारतातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 20,79,77,229 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research ने दिली आहे.

काल महाराष्ट्र राज्यात 3663 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर नवीन 2700 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1981408 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 37125 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.66% झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update Report in marathi 17 February