esakal | Corona Updates: गेल्या वर्षीसारखी स्थिती, एका दिवसात 24,882 बाधित; 2 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona 1.jpg

मागील 53 दिवसांत पहिल्यांदाच सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाखांच्यावर पोहोचली आहे. त्याचबरोबर शुक्रवारी नव्या रुग्णांची संख्या बरे होणाऱ्यांपेक्षा जास्त होती.

Corona Updates: गेल्या वर्षीसारखी स्थिती, एका दिवसात 24,882 बाधित; 2 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली- कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता गेल्या वर्षीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. 2020च्या अखेरीस कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. शुक्रवारी देशभरात 24882 नवी प्रकरणे समोर आली आहेत. त्याशिवाय मागील 24 तासांत यामुळे 140 जणांचे मृत्यू झाला आहे. मागील 53 दिवसांत पहिल्यांदाच सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाखांच्यावर पोहोचली आहे. त्याचबरोबर शुक्रवारी नव्या रुग्णांची संख्या बरे होणाऱ्यांपेक्षा जास्त होती. एकीकडे 19957 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले. तर सुमारे 25 हजार जणांचा याची नव्याने बाधा झाली आहे. परंतु, यात एकच दिलासादायक गोष्ट अशी आहे की, हे प्रमाण महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड या सहा राज्यांमध्येच जास्त आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली-एनसीआरसह इतर राज्यांत परिस्थिती सामान्य आहे. 

एकट्या महाराष्ट्रात शुक्रवारी 15817 नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत. नागपूर, अकोला, पुणे आणि औरंगाबादसारख्या जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती नियंत्रित झाली नाही तर अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावले जाऊ शकते, असे आधीच स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा- शिवसेना नेत्याची किरीट सोमय्यांविरोधात मानहानीची नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पंजाबमध्ये शाळा बंद, रात्रीची संचारबंदी सुरु
पंजाब सरकारने शुक्रवारी आणखी चार जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. एकूण 8 जिल्हे- लुधियाना, पटियाला, मोहाली, फतेहगड साहिब, जालंधर, नवांशहर, कपूरथला आणि होशियारपूरमध्ये रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 
 

loading image
go to top