Corona Updates: देशातील रुग्णांची संख्या 62 लाखांच्या वर; चाचण्यांचे प्रमाण घटले

covid 19
covid 19

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 62 लाखांच्या वर गेला आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 80 हजार 472 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असून 1,179 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील दिवसातील वाढ चिंताजनक आहे. कारण अदल्या दिवशी देशातील कोरोना रुग्णांचा आकडा उतरून 70 हजारांपर्यंत गेला होता. तसेच प्रतिदिन मृत्यूंचा आकडाही जवळपास महिन्यानंतर 1 हजारांच्या खाली आला होता. पण आता कोरोना परिस्थिती जैसे थी झाली आहे, रोज जवळपास 80 ते 90 हजार रुग्ण आढळत आहेत. 

देशात सध्या कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा 62 लाख 25 हजार 764 वर गेला आहे. तर 9 लाख 40 हजार 441 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 51 लाख 87 हजार 826 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.

मंगळवारी देशात सोमवारपेक्षा कमी कोरोना चाचण्या झाल्याचे दिसून आले आहे. देशात मंगळवारी कोरोनाच्या 10 लाख 86 हजार 688 चाचण्या घेण्यात आल्या होत्या. तर आतापर्यंत देशात कोरोनाच्या 7 कोटी 41 लाख 96 हजार 729 चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने ( Indian Council of Medical Research) दिली आहे. 

सुमारे 1 अब्ज 35 कोटी लोकसंख्येच्या भारतात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत सुमारे 14 कोटी नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला असल्याचे निरीक्षण भारतीय आरोग्य संशोधन परिषदेने (आयसीएमआर)  नोंदवले आहे. म्हणजेच, दर १५ लोकांमागे एकजण (लक्षणे दिसत असली-नसली तरी) कोरोनाबाधित झालेला असावा, असे ‘आयसीएमआर’ आज व्यक्त केले.  

आरोग्य सचिव राजेश भूषण व आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी आज भारतातील कोरोना परिस्थितीबाबतची अपडेट दिली. मात्र देशात सामूहिक संसर्ग (कम्युनिटी स्प्रेड) सुरू झालेला नाहीच, या दाव्यावर केंद्र सरकार अजूनही कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com