esakal | लसीकरण मोहिमेपूर्वी 'ड्राय रन' ची ट्रायल, या चार राज्यात होणार चाचपणी 
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination dry run

पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यातील प्रत्येकी दोन जिल्ह्यात ही मॉक ड्रील होणार आहे.  

लसीकरण मोहिमेपूर्वी 'ड्राय रन' ची ट्रायल, या चार राज्यात होणार चाचपणी 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन

Corona Vaccination Dry Run: देशात कोरोना लसीकरण मोहिम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यासाठीची तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. देशभरात लसीकरण वितरण करण्यासाठी व्यवस्था कशी करावी? या पूर्व अभ्यासाला आजपासून सुरुवात होतेय. 28 आणि 29 डिसेंबर रोजी देशातील चार शहरात 'ड्राय रन' ची ट्रायल होणार आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास ही कोरोना लसीकरण अभियानाची मॉक ड्रील आहे असे आपण म्हणू शकतो. देशात जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यातील प्रत्येकी दोन जिल्ह्यात ही मॉक ड्रील होणार आहे.  लसीकरण सुरु झाल्यानंतर ती देशभरात कसे वितरण करायचे. त्यामध्ये येणारे अडथळे आणि त्यावर उपाय यासंदर्भातील चाचपणी करण्यात येणार आहे. लसीकरणापूर्वीच अडचणी जाणून घेऊन उणीव दूर करण्यासाठी ही प्रक्रिया फायदेशीर ठरणार आहे.  

#CoronavirusStrain: आणखी दोन देशांमध्ये नव्या कोरोनाची एन्ट्री

कशी होणार ड्राय रन?


1. ही प्रक्रिया मॉक ड्रिल प्रमाणेच असेल. वॅक्सिनशिवाय संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल.  Co-WIN एपमध्ये डेटा जमा होईल.  कोल्ड स्टोरेजची चाचपणी, कोल्ड स्टोरेजमधून कोविड वॅक्सीन केंद्रावर नेण्याची प्रक्रिया याचा समावेश असेल. 
2. लसीकरणासाठी शक्य तितक्या केंद्राचा वापर करण्यावर भर दिला जाईल. जिल्हा रुग्णालय, सामुदायिक स्वास्थ केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळची रुग्णालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी लस पोहचवण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने ड्राय रनची चाचपणी होईल. 
3. ड्राय रनमध्ये लसीकरण मोहिम सुरु झाल्यानंतर कोणकोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात याचा आढावा घेऊन त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाईल. 
4. यामुळे लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना नेमके काय करायचे याचा अनुभव घेता येईल. त्यामुळे कोणत्या पातळीवर काय निर्णय घ्यावा याचा अंदाजही त्यांना येईल. 
5.  मॉक ड्रिल मॉनिचरिंग जिल्हास्तरावरही करण्यात येईल. त्याचा फिडबॅक राज्य आणि केंद्र सरकारला दिला जाईल. 

loading image