कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण आहे का? 4 राज्यात होणार रंगीत तालीम

corona_20vaccine_2
corona_20vaccine_2

नवी दिल्ली- कोरोनावरील लसीकरणास व्यापक स्वरूपात सुरुवात करण्यापूर्वी पूर्व सज्जतेसाठी पंजाबमध्ये येत्या २८ व २९ रोजी लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे. लसीकरणाची रंगीत तालीम पंजाबसह आंध्र प्रदेश, आसाम आणि गुजरात या राज्यांमध्ये राबविली जाणार आहे. याची माहिती आरोग्य मंत्री बलबीर सिंग सिद्धू यांनी गुरुवारी (ता. २४) दिली.

बलबीर सिंग सिद्धू म्हणाले, ‘‘लसीकरणाची रंगीत तालीम लुधियाना आणि शहीद भगत सिंह नगर येथे होईल. लसीकरणाचा समावेश वैद्यकीय प्रक्रियेत करण्यासाठीच्या यंत्रणेची चाचणी घेण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविली जात आहे. यातून जर काही त्रुटी किंवा अडथळे दिसून आले तर त्याची माहिती देण्यात येणार आहे. यामुळे कोरोना लसीकरणास सुरुवात होण्यापूर्वी सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल.’’ जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक किंवा दोन जिल्ह्यात लशीची रंगीत तालीम होणार आहे.

कोरोना विषाणूचा नवा प्रकार जास्त घातक; मृतांची संख्या वाढणार?

देश पातळीवरील लसीकरण मोहिमेचे मुख्य संघटक संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांचा या तालमीला पाठिंबा आहे, असे बलबीर सिंग सिद्धू यांनी सांगितले.

मंत्रालयाने सांगितल्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे केंद्र उभारले जाणार आहेत. यामध्ये आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी हॉस्पिटल, ग्रामिण केंद्रे यांचा समावेश असणार आहे. या काळात लशींचा पुरवढा, साठवण, रिपोर्टिंग, वाहतूक याबाबत पूर्वाभ्यास केला जाणार आहे.

बिग बी अमिताभ यांच्यावर एका महिलेने केला चोरीचा आरोप

आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलं आहे. जिल्हा स्तरावर 7000 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना सामील करुन घेण्यात आलं आहे. कोविड लशी संबंधी अडचणींना सोडवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर हेल्पलाईन देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जवळजवळ 30 कोटी लोकांना लस दिली जाईल. यात आरोग्य कर्मचारी आणि वयस्कर लोकांचा समावेश असेल.

दरम्यान, अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर कोरोना लस अनेक देशांमध्ये मिळू लागली आहे. ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांमध्ये लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. भारतातही लसीकरण सुरु होणार आहे. कोरोना लशीची पहिली खेप येत्या आठवड्याच भारतात दाखल होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com