esakal | कोरोना विषाणूचा नवा प्रकार जास्त घातक; मृतांची संख्या वाढणार?
sakal

बोलून बातमी शोधा

corona_20positive_20story_

ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन अधिक घातक असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा नवा प्रकार जास्त घातक; मृतांची संख्या वाढणार?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन अधिक घातक असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. तसेच या नव्या स्ट्रेनमुळे अधिक मृत्यू आणि अधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल करायला लागू शकते, असा दावा  Centre for Mathematical Modelling of Infectious Diseases at the London School of Hygiene and Tropical Medicine केला आहे. नवा स्ट्रेन 56 टक्के अधिक प्रसारक्षमता असलेला आहे, असंही सांगण्यात आलंय.

ब्रेकिंग- अभिनेते रजनीकांत हैद्राबादमधील हॉस्पिटलमध्ये दाखल

ब्रिटन सरकारने नव्या स्ट्रेनमुळे 70 टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने विषाणूचा प्रसार होऊ शकतो, असा दावा केला होता. नव्या स्ट्रेनला रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढवायला हवी, असं अभ्यासात सांगण्यात आलं आहे. 2021 मध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढू शकते, तसेच अनेकांना रुग्णालयात दाखव व्हावं लागू शकतं, असा दावा करण्यात आलाय.

मागील आठवड्यात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्यानंतर ब्रिटनमध्ये खळबळ उडाली होती. त्यात आणखी एक तिसरा प्रकार आढळून आलाय. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा विषाणू दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये आढळून आला आहे. ब्रिट्रिश आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी बुधवारी याची माहिती दिली. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांवर त्वरीत बंदी घातली जाणार आहे. 

सावधान! Instant Loan च्या नादात होईल नुकसान; RBI ने दिला सल्ला

ब्रिटनमध्ये व्हायरसचा तिसरा प्रकार

मागील आठवड्यात दक्षिण इंग्लंडमधील कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला होता. हा विषाणू 70 टक्क्यांपेक्षा अधिक वेगाने पसरु शकतो. या विषाणूची माहिती समोर आल्यानंतर भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना स्थगिती दिली होती. 

ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दक्षिण आफ्रिकेच्या जिनोमिक सिक्वेंसिंग क्षमतेचे आम्ही आभारी आहोत. कारण या नव्या प्रकाराशी निगडीत दोन प्रकरणांची आम्हाला माहिती मिळू शकली. या दोन्हीही व्यक्ती मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला जाऊन आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात होते. 

loading image
go to top