कोविन ऍप ठरतंय अडचणीचं; तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणाला उशीर 

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 17 January 2021

देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली- देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या दिवसी किती जणांना कोरोनाची लस  (Corona Vaccination)  देण्यात आली, लशीचे काही दुष्परिणाम झाले किंवा अभियान राबवताना कोणत्या अडचणी आल्या का, याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने म्हटलंय की, देशात 3352 केंद्रांमध्ये 1 लाख 91 हजार 181 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ; व्हायरल चॅटनंतर Balalot ट्विटरवर ट्रेंड

11 राज्यांमध्ये दोन वेगवेगळ्या लसी देण्यात आल्या. ज्यात आसाम, बिहार, दिल्ली, हरियाणा या राज्यांचा समावेश होतो. इतर राज्यांमध्ये केवळ सीरम इन्स्टिट्यूटची लस देण्यात आली. कोरोनाची दुसरी लस भारत बायोटेकची आहे. कोरोनाची लस देण्यात आल्यानंतर कोणावरही दुष्परिणाम दिसले नाहीत किंवा कोणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले नाही. 

कोरोना लसीकरणासाठी तयार करण्यात आलेले कोविन अॅपच्या वापरामध्ये काही अडचणी आल्याचे पाहायला मिळाले. कोविन अॅपची स्पीड कमी होती. त्यामुळे लसीकरणाला उशीर होत होता. अनेक लाभार्थ्यांचा डाटा अपलोड करताना अडचणी आल्या. महाराष्ट्रामध्ये कोविन ऍपसंबंधी काही अडचणींमुळे लसीकरण पुढे ढकलण्यात आले आहे.

विजेच्या तारेने केला घात, बसमधील 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

दुपारी साडेपाच पर्यंत एकूण 1 लाख 65 हजार 574 लोकांना लस देण्यात आली होती. आंध्र प्रदेशमध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक 16, 963 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दुसरा क्रमांक बिहारचा असून 16,401 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. महाराष्ट्रातील 15,727 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. 

लसीकरणासाठी  3,352 केंद्र तयार करण्यात आली . या केंद्रावर  16,755 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. लस दिलेल्या  कोणत्याही व्यक्तीला दुष्परिणाम झालेला नाही. तसेच कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली नाही, ही दिलसादायक माहितीही आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. बिहारमध्ये 16 हजार 401 लोकांना लस टोचण्यात आली.  दुसरीकडे दिल्लीत 3403, गुजरातमध्ये 8557 लोकांना लस देण्यात आली.  उत्तर प्रदेशमध्ये 15 हजार 975 लोकांना लस टोचण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Vaccination how many people vaccinated first day