esakal | 1 मार्चपासून कोणाला मिळणार कोरोना लस? जाणून घ्या रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रक्रिया

बोलून बातमी शोधा

vaccination.}

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा एक मार्चपासून सुरू होणार आहे. यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेहासारखे गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येईल.

desh
1 मार्चपासून कोणाला मिळणार कोरोना लस? जाणून घ्या रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रक्रिया
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा एक मार्चपासून सुरू होणार आहे. यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेहासारखे गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येईल. दहा हजार सरकारी आणि २० हजार खासगी लसीकरण केंद्रांमार्फत ही मोहीम राबविली जाणार असून सरकारी केंद्रांवर नागरिकांना ही लस मोफत मिळेल.  खासगी केंद्रांवर मात्र लसीकरणाचे शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क नेमके किती असेल याबाबत निर्माते आणि रुग्णालयांशी चर्चा करून आरोग्य मंत्रालयातर्फे येत्या तीन ते चार दिवसांत कळविले जाईल, असे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.  

Ayushman Bharat Yojana - आयुष्मान कार्ड आता मोफत; उपचारासह मिळते 5 लाखांचे विमा...

दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी कसे रसिस्ट्रेशन कराल

-पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्संना लस देण्यात आली. केंद्र सरकारकडे मतदान यादीमधील ज्येष्ठ नागरिकांचा डेटा उपलब्ध आहे. पण, सरकारने सेल्फ रेजिस्ट्रेशनचा पर्याय निवडला आहे.

- सेल्फ रेजिस्ट्रेशनमध्ये को-विन, आरोग्य सेतु, रुग्णालय आणि कॉमन सर्व्हिस सेंटरवर रेजिस्ट्रेशन विंडो खुली असेल. या रेजिस्ट्रेशनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

-लवकरच को-विनचे नवे व्हर्जन लॉन्च केले जाईल, यावर सामान्य लोक लसीकरणासाठी नाव रजिस्टर करु शकतील. लस घेतलेले लोक आयडी देऊन आपलं सर्टिफिकेट डाऊनलोड करु शकतात. 

-60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना रेजिस्ट्रेशन करण्यासाठी एक फोटो आयडीची आवश्यकता असेल. अन्य आजाराने पीडित असलेल्या लोकांना मेडिकल सर्टिफिकेट दाखवावे लागणार आहे. 

-सरकार अन्य आजारांसाठी एक यादी आणि फॉर्म जारी करु शकते. याला लाभार्थीकडून भरुन घेतले जाईल. लसीकरणादरम्यान हा फॉर्म दाखवणे आवश्यक असेल. 

-लसीकरणासाठी बुकिंग आणि ओपन स्लॉट असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील.

- लाभार्थी आपली लसीकरण साईट आणि वेळ निवडू शकतात. पण, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनमध्ये तुम्हाला पर्याय दिला जाणार नाही.  तसेच 50 वर्षांपुढील व्यक्ती ज्यांना कसल्याही प्रकारचा आजार नाही, त्यांना लशीसाठी वाट पाहावी लागणार आहे. 

केरळमधील वक्तव्याप्रकरणी कपिल सिब्बलांचा राहुल गांधींना सल्ला, म्हणाले...

दरम्यान, देशात 16 जानेवारीला लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोना लस दिली जात आहे. आतापर्यंत 1 कोटी 15 लाखांच्या आसपास लशीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 40 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण 1 मार्चपासून सुरु होत आहे.