esakal | केरळमधील वक्तव्याप्रकरणी कपिल सिब्बलांचा राहुल गांधींना सल्ला, म्हणाले...

बोलून बातमी शोधा

kapil sibbal.}

काँग्रेसचे वरिष्ठ नेता कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी  (Rahul Gandhi)  यांनी केरळमध्ये केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली

केरळमधील वक्तव्याप्रकरणी कपिल सिब्बलांचा राहुल गांधींना सल्ला, म्हणाले...
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- काँग्रेसचे वरिष्ठ नेता कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी  (Rahul Gandhi)  यांनी केरळमध्ये केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. सिब्बल यांनी म्हटलंय की, मतदारांच्या समजेचा सन्मान केला पाहिजे. कारण त्यांना माहितेय की कोणाला मत द्यायचंय आणि का द्यायचंय. असे असले तरी त्यांनी केरळमध्ये केलेल्या वक्तव्यार भाजपने केलेल्या तिखट हल्ल्यावरुन त्यांनी राहुल गांधींचा बचाव केला. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.  

सरकार 100 कंपन्या विकण्याच्या तयारीत; PM मोदींनी केलं खासगीकरणाचं समर्थन

काँग्रेसचा एका राज्या पाठोपाठ एक पराभवामुळे पक्षावर उघडपणे टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये कपिल सिब्बल यांचाही समावेश होता. त्यामुळे सिब्बल यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर अधिक चांगल्यारितीने स्पष्टीकरण देऊ शकतील. पण, काँग्रेस फूट पाडा आणि राज्य करा या नीतीवर चालणारा पक्ष आहे, असा दावा भाजपने करणे हास्यास्पद असल्याचं कपिल सिब्बल म्हणाले.  भाजपनेच 2014 पासून फूट पाडण्याचे राजकारण केल्याचा आरोप, सिब्बल यांनी केला. 

सिब्बल म्हणाले की, राहुल गांधींच्या वक्तव्यावर टिप्पणी करणारा मी कोणीही नाही. राहुल गांधी यांनी वक्तव्य केलंय त्यामुळे त्यांचे वक्तव्य कोणत्या संदर्भात केलंय हे तेच चांगल्या पद्धतीने सांगू शकतीत. पण, आपणाला मतदारांच्या समजेचा सन्मान करायला पाहिजे, त्यांच्या बुद्धीमत्तेला कमी लेखलं नाही पाहिजे. मतदारांना माहितेय कोणाला मत करायचंय आणि का करायचं. 

राहुल गांधी यांनी केरळ विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान म्हटलं होतं की, गेल्या 15 वर्षात मी उत्तर प्रदेशमधून खासदार राहिलो. मी याठिकाणी वेगळ्या प्रकारच्या राजनीतीचा भाग बनलो होतो. केरळमध्ये येणं माझ्यासाठी उत्साहवर्धक होतं. कारण, मला जाणवलं की येथील लोक मुद्द्यामध्ये रस घेतात. येथील लोकांची समज वेगळी आहे, त्यामुळे याठिकाणचं राजकारण वेगळे आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपने निशाणा साधला होता.