esakal | ओळख पटवल्याशिवाय लस नाही; QR Code-प्रमाणपत्र आणि एकूण अशी असेल यंत्रणा

बोलून बातमी शोधा

corona vaccine

ओळख पटल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला लस दिली जाणार नाही.

ओळख पटवल्याशिवाय लस नाही; QR Code-प्रमाणपत्र आणि एकूण अशी असेल यंत्रणा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि चांदापासून ते बांदापर्यंत कोरोना लशीकरणाची तयारी सरकारद्वारे केली जात आहे. हे लशीकरण सुयोग्यरित्या पार पाडण्यासाठी यंत्रणा उभारली जात आहे. सरकारने त्यासाठी एक सर्टिफिकेट देखील तयार केलं गेलं आहे. हे सर्टिफिकेट लशीकरण झालेल्या प्रत्येक व्यक्तीस देण्यात येईल. या सर्टीफिकेटवर क्यूआर कोड असेल ज्यामध्ये लस दिल्या गेलेल्या व्यक्तीसंबंधी सर्व माहिती सुरक्षित असेल.

इतकंच नव्हे तर सर्टीफिकेटवर लस दिल्या गेलेल्या व्यक्तीचा फोटो असणे अनिवार्य असेल. ओळख पटल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला लस दिली जाणार नाही. लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये ही लस कधी आणि कुठे दिली गेली याचे तपशील असतील. तसेच व्यक्तीला आपले सर्टीफिकेट कसे प्राप्त करता येईल याचीही माहिती असेल.

हेही वाचा - देश कोरोना कोटयधीश होण्याच्या उंबरठ्यावर;९५.४० टक्क्यांची कोरोनावर मात​
लशीकरण प्रमाणपत्रावर असेल फोटो, क्यूआर कोड
आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ आधिकाऱ्याने सांगितलं की प्रत्येक सर्टीफिकेटवर लशीच्या बॅच नंबरचा उल्लेख असेल. एका व्यक्तीला कमीतकमी दोन तर आधिकाधिक तीन खुराक दिले जाऊ शकतात. प्रत्येक खुराकचा बॅच नंबर वॅक्सीनेटर, लशीकरणाचे स्थान आणि तारिख हे देखील सर्टीफिकेटवर लिहणे अनिवार्य असेल आणि क्यूआर कोडद्वारे ही माहिती मिळवणे सोपे जाईल. हे पूर्णपणे डिजीटलाइज्ड सर्टिफिकेट असेल. हे सर्टिफिकेट आपण आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करु शकता.


लशीकरणाची ही असेल प्रक्रिया

  • कोविन ऍप वा वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करावी लागेल.
  • सर्व माहिती देण्याबरोबरच एक ओळखपत्र देखील द्यावं लागेल.
  • ओटीपी द्वारे रजिस्ट्रेशन होईल.
  • एका बूथवर 1 दिवसांत 100 लोकांची अपॉइंटमेंट फिक्स होईल.
  • जर सर्वकाही ठिक असेल तर फोनवर मॅसेज येईल ज्यामध्ये लशीकरणाची वेळ आणि ठिकाणाची माहिती असेल.
  • बुथवर प्रवेशद्वाराजवळ असलेल्या काऊंटरवर ओळखपत्र दाखवावं लागेल.
  • लशीकरणानंतर अर्ध्या तासांसाठी व्यक्तीवर लक्ष ठेवलं जाईल.
  • अर्ध्या तासानंतर लशीकरण कक्षामध्ये सोशल डिस्टन्सिंगने बसण्याची व्यवस्था असेल.
  • त्यानंतर व्यक्ती आपल्या घरी जाऊ  शकते.