भारत बायोटेक इतर कंपन्यांना देणार लशीचा फॉर्म्युला

Covaxin
Covaxin

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची (India Corona) संख्या वाढत असून मृतांच्या संख्याही 4 हजारांच्या वर आहे. दरम्यान, देशातील लसीकरण (Vaccination) मोहिमेला लस तुटवड्यामुळे ब्रेक लागला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी देशातील काही राज्यांकडून परदेशातून लशीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी अशी मागणी केली होती की लशीचा फॉर्म्युला इतर कंपन्यांसोबत शेअर करावा. आता त्याबाबत एक चांगली बातमी समोर येत आहे. निती आयोगाचे (Niti Ayog) सदस्य व्ही के पॉल यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, भारत बायोटेकने (Bharat Biotech) प्रस्ताव स्वीकारला आहे. सरकार आता या प्रयत्नासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे. त्यामुळे आता ज्या कंपन्या लस उत्पादनासाठी सक्षम आणि इच्छूक आहेत त्यांनी पुढे यावं असंही आवाहन पॉल यांनी केलं. (corona vaccine formula bharat biotech agrees to Share with other companies say niti ayog)

व्ही के पॉल म्हणाले की, ''ज्या कंपन्यांना लसीचे उत्पादन करायचे आहे त्यांनी एकत्र येऊन सहकार्यानं काम करावं. लशीचं उत्पादन वाढवण्यासाठी इतर कंपन्यांनासुद्धा लशीचा फॉर्म्युला द्यावा अशी लोकांची मागणी आहे. त्याबाबत आता सांगायला आनंद होतो की भारत बायोटेकने केंद्राचा हा प्रस्ताव स्वीकारला आहे. लस तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये जिवंत विषाणूंना मारलं जातं किंवा त्यांच्यातली मारक क्षमता कमी केली जाते. ही प्रक्रिया BSL 3 लॅबमध्येच होऊ शकते. सर्व कंपन्यांकडे अशा प्रकारची

Covaxin
भारत डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणार; केंद्र सरकारचा रोडमॅप

सध्या देशातील अनेक राज्यात लशीचा तुटवडा आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनीही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे लशीचा फॉर्म्युला शेअर करण्याची मागणी केली होती. त्याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून म्हटलं होतं की, कोव्हॅक्सिन आणि कोवीशील्ड तयार करण्याचा फॉर्म्युला इतर कंपन्यांना मिळायला हवा. यामुळे देशातील लसीचे उत्पादन वाढेल. यासाठी आपल्याला आधी पेटंट कायदा हटवावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com