भारत वॅक्सिनच्या उंबरठ्यावर; PM मोदींकडून पूर्व तयारीचा आढावा

corona vaccine, corona vaccine Update, pm narendra modi, india, covid 19
corona vaccine, corona vaccine Update, pm narendra modi, india, covid 19

Coronavirus Vaccine India Update: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुख्रवारी भारतातील कोविड वॅक्सिनसंदर्भात आढावा घेतला.  ऑक्‍सफर्ड- एस्ट्राजेनेका कंपनीने वॅक्सिन मंजूरीसाठी तयार असल्याचा दावा केल्याची चर्चा रंगत असताना मोदींनी  लशीसंदर्भात आढावा बैठक घेतली. पीएम मोदींनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. कोरोनाची लस वितरण विस्तारासोबतच कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या ट्रेनिंगमध्ये मेडिकल आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांशिवाय फॅकल्टीचाही समावेश करण्यात येणार असल्याचे नियोजन आखण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीनंतरच्या निवेदनातून समोर येत आहे.  पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांसह आरोग्य, परराष्ट्र तसेच निती आयोग या वेगवेगळ्या विभागातील प्रतिनिधी बैठकीला उपस्थितीत होते. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी झाल्यानंतर लसीला मंजूरी देण्यात येणार आहे.  

लसीकरणासंदर्भात सरकारचा असा आहे प्लॅन 
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2021 पर्यंत  25-30 कोटी भारतीयांना लस दिली जाईल. यासाठी 50 ते 60 कोटी डोसची गरज भासणार आहे. प्राधान्य क्रमानुसार  सरकारने एक विशेष यादी देखील केली असून आरोग्य क्षेत्रात कार्यरत लोक, लष्कर, पोलिसांना प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय वयोवृद्धांना देखील पहिल्या यादीत स्थान देण्यात येणार आहे.  

'कोविशील्‍ड'ला मिळू शकते तात्काळ मंजूरी 

भारतात  में ऑक्‍सफर्ड- एस्ट्राजेनेकाची लस सर्वप्रथम उपलब्ध होण्याची आशा आहे. स्थानिक स्तरावर या लशीला Covishield असे नाव देण्यात आले आहे. ही लस शेवटच्या टप्प्यात आहे. अखेरच्या टप्प्यात यश मिळाल्यानंतर या लसीला तात्काळ मंजूरी मिळू शकेल. पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत किफायतशीर दरात लस उपलब्ध होण्याचे बोलले जात आहे. या लशीच्या किंमतीसंदर्भात अद्याप संभ्रम आहे. 

वॅक्सिन ट्रान्सपोर्टसाठी सुरुय खास एयरपोर्टसची तयारी 

देशाच्या कानाकोपऱ्यात लस पोहचवता यावी यासाठी हवाई वाहतूकही सज्ज झाले आहे. एअरपोर्टवर खास युनिट्सच्या तैनात करण्याची तयारी करण्यात आली आहे. दिल्ली आणि हैदराबाद विमानतळावर नियंत्रण ठेवणाऱ्या जीएमआर ग्रुपकडे टाइम एन्ड टेम्‍प्रेचर सेंसिटिव डिस्‍ट्रीब्‍यूशन सिस्‍टम आहे. यात  +25 डिग्री सेल्सियस पासून -20°C पर्यंत तापमान मेंटेन ठेवणे शक्य आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com