दिलासादायक बातमी : गेल्या २४ तासांत देशातील कोरोना रुग्णांंत घट | Covid Patient Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Patient Updates

नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे

दिलासादायक बातमी : गेल्या २४ तासांत देशातील कोरोना रुग्णांंत घट

कोरोनासंदर्भात देशवासियांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ही संख्या आधीच्या दिवसाच्या तुलनेत घसरल्याचं दिसून येत आहे. नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 706 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. (Covid Patient Updates)

हेही वाचा: केरळमध्ये मान्सूनचं आगमन; उकाड्याने त्रस्त जनता सुखावली!

देशातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजारांवर पोहोचली असून सध्या भारतात 17 हजार 698 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत दोन हजार 70 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात रविवारी दिवसभरात म्हणजेच गेल्या 24 तासांत 2 हजार 70 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. यामुळे देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4, कोटी 26 लाख 13 हजार 440 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या 25 नवीन मृत्यूंसह कोरोना बळींची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 611 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, दिल्लीत रविवारी 357 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीतील कोरोना रुग्ण सकारात्मक दर 1.83 टक्के आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एकही नवीन मृत्यू झालेला नाही. तर रविवारी महाराष्ट्रात 550 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये एकूण 324 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासांत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे.

हेही वाचा: प्रसिद्धी, व्यवस्थापनातून मतांचं भरघोस पीक, मोदी सरकारची आठ वर्ष

Web Title: Corona Virus Cases Report Of Health Department Decrease In Corona Patients

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top