Corona Update: पुन्हा लॉकडाऊन? कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये 78 टक्क्यांनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates

Corona Update: पुन्हा लॉकडाऊन? कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये 78 टक्क्यांनी वाढ

पुन्हा एकदा कोरोनामुळे देशासह राज्याच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आणि मृत्यूची संख्या झपाट्याने वाढताना दिसुन येत आहे. गेल्या शनिवारी कोरोना विषाणूचे 1890 नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली, जी गेल्या 210 दिवसांमधील प्रमाणात सर्वाधिक आहे.

गेल्या आठवडाभरातील रुग्णांची तुलना केल्यास, कोरोना विषाणूच्या रुग्णामध्ये 78 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर या काळात मृत्यूची नोंद 19 वरून 29 झाली आहे. शनिवारी समोर आलेल्या कोरोना विषाणूची प्रकरणे गेल्या वर्षी 22 ऑक्टोबरनंतर देशात सर्वाधिक होती, तेव्हा 1,988 नवीन प्रकरणे नोंदवली गेली.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, गेल्या सात दिवसांत (19-25 मार्च) भारतात कोरोना विषाणूची 8,781 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जी मागील सात दिवसांतील 4,929 पेक्षा 78 टक्के जास्त आहे. हे मागील आठवड्यात दिसलेल्या 85 टक्के वाढीइतके आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. देशातील दैनंदिन प्रकरणे आठ दिवसांत दुप्पट होत आहेत. रोजच्या प्रकरणांची सात दिवसांची सरासरी शनिवारपर्यंत 1,254 वर पोहोचली होती, जी आठ दिवस आधी (17 मार्च) 626 होती.

दरम्यान सलग दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात गेल्या सात दिवसांत देशात सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 19 ते 25 मार्च दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाच्या 1,956 प्रकरणांची नोंद झाली आहेत. 12 मार्च ते 19 मार्च या कालावधीत 1,165 प्रकरणे समोर आली आहेत. जी आता 68 टक्के जास्त आहेत. बहुतेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये हरयाणा, दिल्ली, यूपी, गुजरात, हिमाचल आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे.

टॅग्स :covid19Covid-19 cases