नवऱयाने दरवाजा ठोठावताच पत्नीने बोलावले पोलिसांना...

corona virus husband run away home from quarantine center wife calls police at himachal pradesh
corona virus husband run away home from quarantine center wife calls police at himachal pradesh
Updated on

चंबा (हिमाचल प्रदेश): नवऱयाला क्वारंटाईन करण्यात आले होते. पण, क्वारंटाईनच्या ठिकाणावरून पळ काढत त्याने घर गाठले. मध्यरात्री घराचा दरवाजा वाजवल्यानंतर पत्नीने तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि त्याला परत क्वारंटाईन करण्यात आले.

रमेश कुमार हा पठाणकोट येथून घरी आला होता. यामुळे त्याला एक आठवड्यापासून क्वारंटाईन करण्यात आले होते. पण, क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी राहायला त्याचा नकार होता. क्वारंटाईन केलेल्या ठिकाणावरून त्याने पळ काढला आणि दीड किलोमीटर चालत घर गाठले. मध्यरात्री दरावाज वाजवत पत्नीला आवाज दिला. यामुळे पत्नीही घाबरली. तिने दरवाजा न उघडताच पोलिसांना फोन करून पती घरी आल्याची माहिती दिली. काही वेळातच पोलिस दाखल झाले आणि रमेशला ताब्यात घेऊन पु्न्हा क्वारंटाईन केले. क्वारंटाईनचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, रमेशच्या पत्नीचे मात्र पोलिसांनी कौतुक केले आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय, कोरोना बाधितांना क्वारंटाईन केले जात आहे. तरीही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन, पोलिस रात्रंदिवस प्रयत्न करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com