जगातील पहिली घटना; अमेरिकेत कोरोनामुळे लहान बाळाचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 29 मार्च 2020

कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग वाढत असून, त्यामुळे जगभरातील बळींची संख्याही वेगाने वाढते आहे. मात्र, कोरोनाच्या जागतिक साधीमध्ये लहान बाळाचा बळी गेल्याची जगभरातील ही पहिलीच घटना मानली जात आहे. 

वॉशिंग्टन - अमेरिकेतील इलिनॉईसमध्ये कोरोनाच्या विषाणूची बाधा झालेल्या एका लहान बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग वाढत असून, त्यामुळे जगभरातील बळींची संख्याही वेगाने वाढते आहे. मात्र, कोरोनाच्या जागतिक साधीमध्ये लहान बाळाचा बळी गेल्याची जगभरातील ही पहिलीच घटना मानली जात आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इलिनॉईसचे गव्हर्नर जे. बी. प्रित्झकेर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, मागील २४ तासांत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका लहान बाळाचा समावेश आहे. शिकागोमध्ये ही घटना घडली असून, हे बाळ एक वर्षांहूनही कमी वयाचे होते. त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 

Coronavirus : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या १०००च्या पार; तर बळींचा आकडा...

कोरोनामुळे लहान बाळाचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालकांनी दिली. या बाळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. ही बातमी एकूण आपण हादरून गेलो, अशी प्रतिक्रिया गव्हर्नर प्रित्झकेर यांनी व्यक्त केली. 

- Coronavirus : आपण आपल्या संयमांचं अतुलनीय दर्शन घडवलं; धन्यवाद ! : मुख्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus usa baby died first incident worldwide