लॉकडाऊनला नागरिक गांभीर्याने घेत नाहीत : मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 23 मार्च 2020

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यु लावण्यात आला होता. आजपासून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन असताना नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या लॉकडाऊनचा निर्णय नागरिक गांभीर्याने घेत नाहीत. राज्य सरकारने नियमांचे पालन करावे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यु लावण्यात आला होता. आजपासून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन असताना नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. काल थाळीनाद, शंखनादावेळी अनेक नागरिक एकत्र जमल्याचेही दिसले होते. यावरून मोदींनी आज ट्विट करत सरकारच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, महाराष्ट्रातील मृतांची संख्या 3 वर गेली आहे.

मोदी म्हणाले, की लॉकडाऊनला अजूनही काही जण गांभीर्याने घेत नाहीत. कृपा करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवा. सरकारने घातलेल्या नियमांचे पालन करा. राज्य सरकारांना माझे सांगणे आहे, की त्यांनी नियम आणि कायद्याचे पालन करावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus PM Narendra Modi tweets about lockdown