कोरोना व्हायरसनंतर आता ‘डिसिज एक्स’ या घातक विषाणूचा धोका

वृत्तसंस्था
Wednesday, 6 January 2021

कोरोना व्हायरसवर जगभरात लसीकरण सुरू होत असल्याने कोरोनाची भीती कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र कोरोनाचा नष्ट झाला तरी रोगांपासून मुक्ती मिळणे सध्या तरी शक्य नाही. कारण ‘डिसिज एक्स’ या घातक विषाणूचा धोका उद्‍भवणार असल्याचा इशारा डॉ. प्रा. जीन जॅक्स मुयेम्बे टॅमफ्युम यांनी दिला.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसवर जगभरात लसीकरण सुरू होत असल्याने कोरोनाची भीती कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र कोरोनाचा नष्ट झाला तरी रोगांपासून मुक्ती मिळणे सध्या तरी शक्य नाही. कारण ‘डिसिज एक्स’ या घातक विषाणूचा धोका उद्‍भवणार असल्याचा इशारा डॉ. प्रा. जीन जॅक्स मुयेम्बे टॅमफ्युम यांनी दिला.

Corona Update : राज्यात नवे 3,160 रुग्ण; गेल्या 24 तासांत देशात 264 मृत्यू

इबोला विषाणू १९७६ मध्ये शोधण्यात टॅमफ्युम यांना मोठा वाटा आहे. अनेक नव्या विषाणूंचा सामना मानव जातीला करावा लागणार आहे. आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय वर्षावनात हा अज्ञात विषाणू  सापडला आहे, असा दावा त्यांनी केला. भविष्यातील जागतिक रोग साथ ही कोरोनापेक्षा जास्त हानिकारक व भयंकर असेल, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हेमोरॅजिक तापाची लक्षणे काँगोमधील महिलेमध्ये आढळली असून तिची इबोला चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आल्याने तिला ‘डिसिज एक्स’चा संसर्ग झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus risk deadly disease Disease X