Corona Update : राज्यात नवे 3,160 रुग्ण; गेल्या 24 तासांत देशात 264 मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

गेल्या 24 तासांत भारतात 18,088 नवे रुग्ण आढळले आहेत.

नवी दिल्ली : गेल्या एका वर्षापासून जगभरात कोरोना नावाच्या विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोना नावाचा व्हायरस पसरल्यापासून आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संक्रमणाची नोंद झाली आहे. एका दिवसात सर्वाधिक म्हणजे 60,196 नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये सापडल्यानंतर तिथे अत्यंत गतीने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. 

गेल्या 24 तासांत भारतात 18,088 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 1,03,74,932 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 21,314 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 99,97,272 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 264 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील एकूण कोरोनामृतांची संख्या ही 1,50,114 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात एकूण 2,27,546 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

हेही वाचा - ब्रिटनमध्ये आढळले आजवरचे सर्वाधिक कोरोनाबाधित; नव्या स्ट्रेनचा कहर

देशात काल एका दिवसात 9,31,408 कोरोनाच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील एकूण चाचण्यांची संख्या ही 17,74,63,405 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research ने दिली आहे. 

महाराष्ट्र राज्यात काल एका दिवसात नवे 3,160 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 19,50,171 वर जाऊन पोहोचली आहे. राज्यात काल 2,828 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,50,189 जाऊन पोहोचली आहे. राज्यात काल 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 49,759 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 49,067 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update india 6 january 2021