corona update: तीन महिन्यानंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद; महामारीचा वेग मंदावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corono_update_

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटताना दिसत आहे.

corona update: तीन महिन्यानंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद; महामारीचा वेग मंदावला

नवी दिल्ली- भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 36,469 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 18 जूलैनंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 79,46,429 इतका झाला आहे. सोमवारी 488 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या 1,19,502 झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घडत आहे. सोमवारी कोरोनाबाधिकांची संख्या 40 हजारांच्या खाली गेली. 18 जूलैनंतर पहिल्यांदाच असं घडच आहे, त्यामुळे ही समाधानाची बाब आहे. देशात सध्या 6,25,857 सक्रिय कोरोना रुग्ण आहे. गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 27,860 ने घट झाली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची एकूण 72,01,070 झाली आहे. गेल्या 24 तासात 63, 842 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
 

loading image
go to top