esakal | दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर दुपटीने वाढणार

बोलून बातमी शोधा

Coronavirus
दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर दुपटीने वाढणार
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - महाराष्ट्रात कोरोनाचा कहर माजला असताना आता राजधानी दिल्लीला देखील कोरोनाने विळखा घातला आहे. पुढील आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या टोक गाठणार असल्याचा स्पष्ट इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला. रुग्ण संसर्गाचा दर हा ५० टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

दिल्लीतील एम्समधील क्रिटिकल यूनिट केअरमधील कोविड व्यवस्थापन गटाचे सदस्य सहायक प्राध्यापक डॉ. युधवीर सिंग म्हणाले, ‘‘राजधानीसाठी पुढील आठवडा कसोटीचा असणार आहे. ही लाट काही दिवसांमध्ये वाढणार आहे. रुग्णांना संसर्ग होण्याचा दर हा ५० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस रुग्णसंख्या कमी होण्यास सुरवात होईल. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परिस्थिती तुलनेने चांगली होईल.’’

कोरोनाचे बदललेले रुप हे खूप संसर्गजन्य आहे. कुटुंबेच्या कुटुंबे पॉझिटिव्ह होत आहेत, अशा स्थितीतही लोकांनी त्यांचे मास्क आणि सुरक्षा विषयक नियमांचे ‘कवच’ बाजूला ठेवले आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. असे सिंग यांनी स्पष्ट केले.