esakal | महानगरांमधून बिहारमध्ये परतणासाठी सरकारचा 'वेगळा' निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

bihar-map

देशभरातील व्यवसाय बंद झाल्याने आपापल्या गावी परतणाऱ्या कामगारांना राज्यांच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या शाळा आणि कॉलेजमध्ये ठेवण्यात येणार असून सध्या या ठिकाणी तीन ते पाच हजार नागरिकांना विलगीकरणात ठेवण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

महानगरांमधून बिहारमध्ये परतणासाठी सरकारचा 'वेगळा' निर्णय

sakal_logo
By
उज्वल कुमार ; सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांच्या टाळेबंदीची घोषणा केल्यानंतर देशाच्या सर्व भागांमधून बिहारमध्ये परतणाऱ्या कामगारांना राज्याच्या सीमावर्ती भागांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशभरातील व्यवसाय बंद झाल्याने आपापल्या गावी परतणाऱ्या कामगारांना राज्यांच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या शाळा आणि कॉलेजमध्ये ठेवण्यात येणार असून सध्या या ठिकाणी तीन ते पाच हजार नागरिकांना विलगीकरणात ठेवण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. केंद्रीय कॅबिनेट सचिव व गृहसचिवांसह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमीर शमनी आणि डीजीपी यांच्या समवेत बिहारचे मुख्य सचिव दीपक कुमार यांनी शनिवारी उशिरा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्य सरकारने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केलेल्या तयारीचा आढावा दिला. तसेच राज्य सरकार उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकारच्या सतत संपर्कात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Coronavirus : कोरोनामुळं हे बेस्ट झालं; 'या' शहरांनी घेतला मोकाळा श्वास

अतिरिक्त मुख्य सचिव आमिर रौतानी यांनी सांगितले, की इतर राज्यातून नागरिक यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बिहारला जोडणाऱ्या इतर राज्यांच्या रस्त्यांवरील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये या नागरिकांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांची भोजनाची व इतर व्यवस्था केली असून येथे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

loading image