Coronavirus : कोरोनामुळं हे बेस्ट झालं; 'या' शहरांनी घेतला मोकाळा श्वास 

coronavirus india update pollution level decrease metro cities delhi
coronavirus india update pollution level decrease metro cities delhi

नवी दिल्ली - देशव्यापी लॉकडाउनमुळे सध्या सर्वकाही ठप्प झाले असल्याने देशभरातील नव्वद शहरांमधील प्रदूषणाची पातळी निचांकी स्तरावर आली आहे. एरव्ही धुरकट दिसणाऱ्या राजधानी दिल्लीतील हवा काहीशी शुद्ध झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पर्यावरणतज्ज्ञांनी सरकार आणि यंत्रणेने ही बाब सावधगिरीचा इशारा म्हणून पहायला हवी असे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील ‘सिस्टिम ऑफ एअर क्वॉलिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’ (सफर) या संस्थेने केलेल्या पाहणीतून बरेच सकारात्मक निष्कर्ष हाती आले आहेत. 

विषारी वायू घटले 
दिल्लीतील पीएम-२.५ कणांचे प्रमाण तीस टक्क्यांनी घटले असून अहमदाबाद आणि पुण्यामध्ये ही पातळी पंधरा टक्के एवढी आहे. श्‍वसनविकाराला कारणीभूत ठरणाऱ्या नायट्रोजन ऑक्साइडच्या प्रमाणामध्येही लक्षणीय घट झाली आहे. वाहतुकीमुळे हवेतील हा घटक वाढतो. पुण्याच्या हवेतील नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण ४३ टक्क्यांनी कमी झाले असून मुंबईत ते ३८ आणि अहमदाबादेत ५० टक्क्यांनी घटले आहे. 

हा लॉकडाउनचा प्रभाव आहे, उद्योग आणि बांधकामे थांबली असून हवेची गुणवत्ता सुधारत आहे. याचमध्ये पाऊस कोसळू लागल्याने त्याला हातभारच लागला. 
गुफरान बेग, संशोधक सफर 

शहरांत स्थिती 
९२ शहरांत - वायू प्रदूषण घटले 
३९ शहरांत - हवेचा दर्जा चांगला 
५१ शहरांत -समाधानकारक स्थिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com