esakal | Coronavirus : दिलासादायक ! २४ तासात वाढले ०६ टक्के रुग्ण; १४ मार्चनंतर सर्वात कमी वृद्धीदर
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus Cases Rose By 1490, Good News Is That Cases Increase By Only 6 Per Cent In 24 Hrs

कोरोना व्हायरसाच प्रादुर्भाव वाढत असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. गेल्या २४ तासांत रुग्ण वाढीचा दर केवळ ०६ टक्के आहे. यापूर्वी दिवसाता ९.१ दिवसांत रुग्ण डबल होत होते.

Coronavirus : दिलासादायक ! २४ तासात वाढले ०६ टक्के रुग्ण; १४ मार्चनंतर सर्वात कमी वृद्धीदर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसाच प्रादुर्भाव वाढत असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. गेल्या २४ तासांत रुग्ण वाढीचा दर केवळ ०६ टक्के आहे. यापूर्वी दिवसाता ९.१ दिवसांत रुग्ण डबल होत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मिळालेल्या अहवालानुसार, पहिल्या १०० रुग्णांनंतर पहिल्यांदाच एवढा रुग्णांचा एवढा कमी दर पाहायला मिळाला आहे. देशात १४ मार्च रोजी रुग्णांचा आकडा १००वर पोहोचला होता. म्हणजेच १४ मार्चनंतर पहिल्यांदाच रुग्णांचा वाढीचा दर एवढा कमी राहिला आहे. आरोग्य मंत्रालयाने काल (ता. २५) शनिवारी रात्री जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात २४९४२ रुग्ण आढळले आहेत. 

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी टीसीएसचे पाऊल; पुढील पाच वर्षासाठी घेतला 'हा' निर्णय

यामधील मागील २४ तासांत केवळ १४९० पॉजिटिव्ह केसेस मिळाल्या आहेत. तसेच, ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण ५२०९ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. आता देशात एकूण १८९५३ कोरोनाचे रुग्ण आहेत. दरम्यान, एक महिन्यापासून भारतात लॉकडाऊन लागू केले होते. त्यावेळी भारतात केवळ ५०० कोरोनाग्रस्त रुग्ण होते. परंतु २४ मार्चपासून आतार्यंत दररोज २१.०६ च्या वृद्धीदर होता. तो आता घटून ०६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 

या सात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशाच्या तुलनेत गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि झारखंड या सात राज्यात अधिक आहे. दरम्यान, दिल्लीसोबतच आता आणखी काही राज्यात प्लाजमा थेरपीला परवानगी देण्यात आली आहे.

loading image
go to top