धक्कादायक! 2020 च्या शेवटापर्यंत 8.6 कोटी लहान बालकांसाठी हा आहे मोठा धोका

यूएनआय
शुक्रवार, 29 मे 2020

कोरोना व्हायरसने जगात असामान्य आणि अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभर सर्व आर्थिक उपक्रम बंद आहेत. अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अशात कोरोना व्हायरस महामारीने निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे 2020 च्या शेवटापर्यंत कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये 8.6 कोटी लहान मुले गरिबीमध्ये लोटली जातील असं सांगण्यात आलं आहे.

दिल्ली - कोरोना व्हायरसने जगात असामान्य आणि अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभर सर्व आर्थिक उपक्रम बंद आहेत. अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अशात कोरोना व्हायरस महामारीने निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे 2020 च्या शेवटापर्यंत कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये 8.6 कोटी लहान मुले गरिबीमध्ये लोटली जातील असं सांगण्यात आलं आहे. यूनिसेफ आणि मानवतावादी संगठन 'सेव्ह द चिल्ड्रन' यांच्या संयुक्त अध्ययनात हा दावा करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना महामारीमुळे कमी उत्पन्न गटात मोडणाऱ्या कुटुंबापुढे बिकट परिस्थिती निर्माण केली आहे. तसेच मध्यम उत्पन्न गटात मोडणाऱ्या कुटुंबाचा समावेश काही काळाने कमी उत्पन्न गटात करावा लागेल. कोरोनामुळे गरीबांसमोर मोठे संकट उभे केले आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी काही ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर 2020च्या शेवटी 8.6 करोड लहान मुलं पारिवारिक गरीबीमध्ये जातील, असं यूनेसेफनं म्हटलं आहे.

येत्या काळात ऑफिसेसमध्ये करावे लागतील हे बदल, कारण....

कोरोना महामारीने सध्या जगभरात थैमान घातले आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना व्हायरसचे 56,95,290 रुग्ण आहेत, तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3,55,692 वर पोहोचली आहे. 2020 च्या शेवटापर्यंत हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात जग मोठ्या कठीण प्रसंगातून जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी काही ठोस उपाय केले गेले नाहीत तर कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये राष्ट्रीय गरिबी रेषेच्या खाली राहणाऱ्या एकूण मुलांची संख्या 67.2 कोटी होईल, अशी भीती यूनेसेफने व्यक्त केली आहे. तसेच यादृष्टीने काम करण्याचे आवाहन गरीब राष्ट्रांना केले आहे.

लॉकडाउनमध्ये तिची होतेय घुसमट; मासिक धर्मावरून स्त्रियांचा कोंडमारा

विश्लेषणानुसार, जवळजवळ 2/3 गरीब लहानमुळे उप-सहारा आफ्रीका आणि दक्षिण आशियामध्ये राहतात. सर्वाधिक वृद्धी युरोप आणि मध्य आशियामधील देशांमध्ये दिसून येऊ शकते. लॅटिन अमेरिका आणि कैरेबियन देशांमध्ये 22 टक्के वृद्धी पाहायला मिळू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus epidemic could push 8.6 cr child in poverty