Coronavirus In India : कोरोनाच्या वाढत्या धोक्यात केंद्राकडून SOP's जारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus in India

Coronavirus In India : कोरोनाच्या वाढत्या धोक्यात केंद्राकडून SOP's जारी

Coronavirus In India : चीन, जपान आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता भारत सरकारने सावध पावंल उचलण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

जगभरातील वाढती कोरोनाची रूग्णसंख्या पाहता केंद्राकडून एसआोपीज जारी करण्यात आल्या आहेत. चीनमध्ये कोरोनाच्या BF.7 व्हेरिएंटचे रूग्ण वाढत असताना केंद्र आणि राज्यांनीदेखील तयारी सुरू केली आहे. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीदेखील कोविड-19 च्या प्रतिबंधाच्या तयारीबाबत राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत आहेत.

हेही वाचा: Indian Army Advisory : कोरोनाच्या वाढत्या धोक्यात भारतीय लष्कराने जारी केली अ‍ॅडवायजरी

केंद्राच्या एसओपीजमध्ये काय?

दरम्यान, जगातील काही देशांमध्ये वाढती कोरोनाची रूग्णसंख्या पाहता केंद्र सरकारकडून शुक्रवारी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. याममध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहून येत्या काही दिवसांत सणांचे दिवस येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रूग्णसंख्येकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच टेस्टिंग, ट्रिटमेंट आणि ट्रेसिंगवर भर देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय नागरिक बूस्टर डोस घेत असल्याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Coronavirus : कोरोनाचा उद्रेक होताच कर्नाटक सरकार अ‍ॅक्शन मोडवर; 'मास्क'बाबत घेतला महत्वाचा निर्णय

नरेंद्र मोदी घेतली आढवा बैठक

दरम्यान, जगभरात वाढत्या कोरोनाच्या धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली.

या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, आरोग्य सचिव राजेश भूषण, गृह सचिव अजय कुमार भल्ला आणि अनेक वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत मोदींनी मॉनिटरिंग आणि चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचे तसेच कोरोना अद्याप संपलेला नसल्याचे सांगत नागरिकांना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय मोदींनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवरही बारीक नजर ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.