esakal | देशात दोन दिवसांत १ लाखांपेक्षा जास्त रुग्ण; आकडा १९ लाख पार
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus India Daily increase of 50000 cases for a week

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होत असून देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आता १९ लाखांचा आकडा पार केला आहे. काल (ता. ०६) एका दिवसात भारतात एकूण ५२५०९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दोन दिवसांत भारतातील कोरोनाबाधितांची आकडेवारी १८ लाखांवरून १९ लाखांवर पोहोचली आहे.

देशात दोन दिवसांत १ लाखांपेक्षा जास्त रुग्ण; आकडा १९ लाख पार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होत असून देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आता १९ लाखांचा आकडा पार केला आहे. काल (ता. ०६) एका दिवसात भारतात एकूण ५२५०९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दोन दिवसांत भारतातील कोरोनाबाधितांची आकडेवारी १८ लाखांवरून १९ लाखांवर पोहोचली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

केंद्रिय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत १२ लाख ८२ हजार २१५ लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेली असून महाराष्ट्रात गेल्या २४ तासात १० हजार ३०९ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. या आकड्यांसोबतच आता महराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या आता ४ लाख ६८ हजार २६५ वर पोहोचली आहे. तसेच मागील २४ तासात राज्यात ३३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

आंध्र प्रदेशमध्ये सलग तिसऱ्या दिवशी १० हजारांपेक्षा जास्त रुग्ण
आंध्र प्रदेशातही सातत्याने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून बुधवारी एका दिवसात १० हजार १२८ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. तामिळनाडूत आता एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही १ लाख ८६ हजार ४६१ झाली आहे. सलग तीन दिवसांपासून तामिळनाडूमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडत आहे.

कर्नाटकात एका दिवसात १०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू
कर्नाटकात मागील २४ तासात कोरोनामुळे एकूण १०० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटकच्या आरोग्य विभागाने दिली आहे. कर्नाटकमध्ये आतापर्यंत एकूण २८०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, कर्नाटकात आतापर्यंत एकूण १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, काल एका दिवसात कर्नाटकामध्ये एकूण ५ हजार ४०७ लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयांतून सुटी देण्यात आली आहे

सीआरपीएफच्या सहायक पोलिस निरिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू
दरम्यान, जम्मू-कश्मीरमधील श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू पावलेले अधिकारी हे ४९ वर्षाचे असून ते १७६व्या बटालियनचे जवान होते. ते जम्मू-कश्मीरमध्ये सेवेत होते. सीआरपीएफमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे एकूण २१ जवानांचा मृत्यू झाला आहे असून काल एका दिवसात सीआरपीएफमध्ये ९९ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत.

loading image