esakal | Corona Updates: कोरोनाचं 'रौद्ररुप'; २४ तासांत आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण

बोलून बातमी शोधा

Corona_Mental_Health

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक कोटी ३५ लाख २७ हजार ७१७ इतकी झाली आहे. तर एक लाख ७० हजार १७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Corona Updates: कोरोनाचं 'रौद्ररुप'; २४ तासांत आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Coronavirus Updates: नवी दिल्ली/पुणे : कोरोना रुग्णवाढीचा रविवारी (ता.११) नोंदवला गेलेला उच्चांक सोमवारी (ता.१२) मोडीत काढला आहे. गेल्या २४ तासातील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून, हे आकडे पाहून मनात नक्कीच धडकी भरेल. रविवारी दीड लाखाचा आकडा ओलांडल्यानंतर आता त्यात आणखी सतरा हजार रुग्णांची भर पडली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब आणि तमिळनाडूसारख्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

आरोग्य मंत्रायलाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात एक लाख ६८ हजार ९१२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल ९०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यंदाच्या वर्षातील एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे.

यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक कोटी ३५ लाख २७ हजार ७१७ इतकी झाली आहे. तर एक लाख ७० हजार १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एक कोटी २१ लाख ५६ हजार ५२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १२ लाख १ हजार ९ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत २५ कोटी ७८ लाख ६ हजार ९८६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात ११ लाख ८० हजार १३६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तसेच आतापर्यंत १० कोटी, ४५ लाख, २८ हजार ५६५ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)