भारत ब्राझील, अमेरिकेलाही मागे टाकतोय; देशात, 5 राज्यांमध्ये कोरोनाचा कहर

सुशांत जाधव
Saturday, 8 August 2020

मागील दोन दिवसांपासून देशातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 60 हजारच्या घरात आहे.

नवी दिल्ली: देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भावा दिवसागणिक वाढताना दिसतोय. सलग चौथ्या दिवशी देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकड्यात वाढ झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे चार दिवसांत जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. WHO ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यानच्या आकडेवारीत 4, 5, 6 आणि 7 ऑगस्ट रोजी देशात इतर राष्ट्रांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.  WHO च्या आकडेवारीनुसार, 1 ऑगस्ट रोजी अमेरिकेत 67,823 रुग्ण आढळले. ब्राझीमध्ये हा आकडा 57,837 होता तर भारतात 57,118 रुग्ण सापडले होते.  2 ऑगस्ट रोजी अमेरिका ( 67,499) ब्राझील (52,383) आणि भारत (54,735) इतके रुग्ण आढळले होते. 3 ऑगस्ट अमेरिका (58,388), ब्राझील (45,392) आणि भारत (52,9720) अशी आकडेवारी होती.

जगातील पहिल्या कोरोना लसीची 12 ऑगस्ट रोजी नोंदणी!

4 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 47,183 आणि ब्राझीलमधील रुग्णांची संख्या 25,800 इतकी असताना भारतात 52,050 नव्या रुग्णांची भर पडली. 5 ऑगस्ट रोजी अमेरिकेत 49,151 तर ब्राझीलमध्ये 16,641 रुग्ण आढळले. भारतात पूर्वीपेक्षा अधिक रुग्णांची भर पडून आकडा 52,509 इतका झाला.  6 ऑगस्ट अमेरिकेत 49,629  रुग्ण, ब्राझीलमध्ये 51,603 तर भारतात 56,282 नव्या रुग्णांची भर पडली. 7 ऑगस्ट रोजी देखील भारतातील आकडा अमेरिका आणि ब्राझीलच्या तुलनेत वाढल्याचे दिसले. अमेरिकेत 53,373 आणि ब्राझीलमध्ये  57,152 नवे रुग्ण आढळले असताना देशातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 62,538 घरात पोहचल्याचे पाहायला मिळाले. 

कोरोनामुक्त झालेल्या 90 टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा आजार

Top 5 Coronavirus Infected States : मागील दोन दिवसांपासून देशातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 60 हजारच्या घरात आहे. देशातील एकंदरीत आकडा हा 21 लाखांच्या घरात पोहचला असून महाराष्ट्राची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य अपयशी ठरल्याचे चित्र आहे. मागील 24 तासांत महाराष्ट्रात  10,483 नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या राज्यांच्या यादीत आंध्र प्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे. येथील नव्या रुग्णांचा आकडा ही 10 हजारीच्या घरात आहे. तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्येही भीषण परिस्थिती आहे. मागील 24 तासांत महाराष्ट्र राज्यात 300 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तामिळनाडू (119), कर्नाटक (101), आंध्र प्रदेश 89 आणि उत्तर प्रदेश 63 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus india report maximum cases of covid 19 in india 5 Most infected states