देशात धोका वाढला; 24 तासांत आढळले कोरोनाचे 16,906 नवे रुग्ण, 45 जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus India Reports

कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वाढलाय आहे.

देशात धोका वाढला; 24 तासांत आढळले कोरोनाचे 16,906 नवे रुग्ण, 45 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग (Coronavirus in India) पुन्हा एकदा वाढलाय. गेल्या 24 तासांत देशभरात 16,906 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 45 जणांचा मृत्यू झालाय. आता देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 32 हजारांच्या पुढं गेलीय. तर, दैनंदिन सकारात्मकतेचा दर 3.68 टक्केवर गेला आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांचे 'ते' शब्द आठवताच दीपक केसरकरांना हुंदका आवरता आला नाही!

आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 15,447 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत. मंगळवारी दिल्लीत कोविड-19 चे 400 नवीन रुग्ण आढळून आले असून संसर्ग दर 2.92 टक्के होता, तर एकाचा मृत्यू झालाय. आरोग्य विभागाच्या बुलेटिनमध्ये म्हटलंय की, नवीन प्रकरणांसह दिल्लीतील संक्रमितांची संख्या 19,41,415 झाली आहे, तर मृतांची संख्या 26,285 वर राहिलीय. देशाच्या राजधानीत सोमवारी कोविडचे 280 रुग्ण आढळले. परंतु, एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

हेही वाचा: JEE Main : मजूर आई-बापाच्या पोरानं JEE परीक्षेत मिळवले 99.93 टक्के गुण

महाराष्ट्रात कोरोनामुळं 13 रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 2 हजार 435 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 2 हजार 882 रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 78 लाख 42 हजार 90 वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 13 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळं एकूण मृतांचा आकडा 1 लाख 47 हजार 991 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात 17 हजार 567 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Coronavirus India Reports 16906 Fresh Cases And 45 Deaths In The Last 24 Hours

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top