मुख्यमंत्र्यांचे 'ते' शब्द आठवताच दीपक केसरकरांना हुंदका आवरता आला नाही! | Deepak Kesarkar News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Kesarkar News

'एवढ्या मोठ्या मनाचा माणूस मी आजपर्यंत बघितला नाही.'

मुख्यमंत्र्यांचे 'ते' शब्द आठवताच दीपक केसरकरांना हुंदका आवरता आला नाही!

सिंधुदुर्ग : राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तब्बल 50 आमदारांनी महाविकास आघाडीविरोधात (Mahavikas Aghadi) भूमिका घेतल्यानं सरकार अल्पमतात आलं. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केवळ सरकार नव्हे, तर शिवसेना कुणाची हे दाखवण्याची वेळ आलीय.(Deepak Kesarkar News)

दरम्यान, सिंधुदुर्गमधील आमदार आणि बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हेदेखील मंगळवारी सावंतवाडी मतदारसंघात (Sawantwadi Constituency) दाखल झाले. समर्थकांनी 'दीपक केसरकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशी घोषणाबाजी करत केसरकर यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबतचा संवाद सांगताना दीपक केसरकर हे काहीसे भावूक झाले. 'मी माझ्या मतदारसंघात जाणार असल्याचं जेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं, तेव्हा लगेच आवश्यकता असेल तर मीही तुमच्यासोबत येतो, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी स्वत:ही माझ्यासोबत येण्याची तयारी दर्शवली.

हेही वाचा: संतोष बांगरांनंतर शिंदे गटातील आणखी एका बंडखोराला शिवसेनेचा दणका

एवढ्या मोठ्या मनाचा माणूस मी आजपर्यंत बघितला नाही. ज्यानं आपल्या गटाचं प्रतिनिधित्व केलं, आपली ज्यानं बाजू मांडली त्याच्याबरोबर मी सुद्धा त्याच्या मतदारसंघामध्ये गेलं पाहिजे, अशी जर भावना कुठला मुख्यमंत्री ठेवत असतील तर ते महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकतो,' असं केसरकर म्हणाले. यावेळी बोलताना केसरकर यांना हुंदका आवरता आला नसल्याचंही पाहायला मिळालं. दरम्यान, गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मतदारसंघात दाखल झालेल्या दीपक केसरकर यांनी त्यांच्या निवासस्थानी साईंच्या पालखीची पूजा केली. त्यानंतर सावंतवाडीतून शिंदे गटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले.

हेही वाचा: अशोक स्तंभाचं बांधकाम करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी विचारले 'हे' 5 मजेशीर प्रश्न

Web Title: Deepak Kesarkar Became Emotional After Hearing The Words Of Eknath Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..