Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; आता...

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 मार्च 2020

इतर देशातील नागरिकांना वेगळे ठेवले जाणार

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसचा फटका 100 हून अधिक देशांना बसला आहे. या व्हायरसची लागण होऊ नये या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसचा फटका जगभरातील अनेक देशांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) जगात महामारी पसरल्याचे घोषित केले आहे. गेल्या काही दिवसांत भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचलले आहे.

त्यानुसार, 15 एप्रिलपर्यंत सगळे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. परदेशातून येणाऱ्या व्यक्तींपासून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो याची खबरदारी लक्षात घेता डब्ल्यूएचओने हा निर्णय घेतला आहे. मात्र, संयुक्त राष्ट्र, राजदूत आणि महत्त्वाच्या प्रकल्पांवरील अधिकाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Good News : कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नष्ट होणार, रसायनचा शोध

जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यटकांचे व्हिसा 13 मार्चपासून (उद्या) रद्द होतील. त्यानंतर 15 एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. तसेच परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही या कालावधीत प्रवेश दिला जाणार नाही.

इतर देशातील नागरिकांना वेगळे ठेवले जाणार

15 फेब्रुवारी 2020 नंतर भारतात दाखल झालेल्या चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीच्या नागरिकांना वेगळं ठेवण्यात येणार आहे. या देशांमधून आलेल्या भारतीय नागरिकांनादेखील किमान 15 दिवस वेगळे ठेवले जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus India suspends all tourist visas