भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 9 लाखांवर; अशी आहे सद्यस्थिती...

कृपादान आवळे
बुधवार, 15 जुलै 2020

भारत तिसऱ्या स्थानावर

- कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 लाखांपेक्षा अधिक

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरस अमेरिका, ब्राझील, भारत, रशियासह जगभरात थैमान घालत आहे. भारतातही याचे प्रमाण वाढत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात आत्तापर्यंत 9,37,487 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची यापूर्वी इतर देशांच्या तुलनेने कमी होती. मात्र, आता त्यामध्ये वाढ झाली आहे. तसेच यातील मृतांची संख्याही वाढत आहे. 'वर्ल्डो मीटर्स'नुसार, देशभरात सध्या 9,37,487 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 24,315 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 5,93,080 कोरोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Coronavirus

कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 लाखांपेक्षा अधिक

भारतात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आत्तापर्यंत 9,37,487 नागरिकांना कोरोनाची लागण झाली. तर यामध्ये 24,315 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 5,93,080 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय देशात सध्या 3,20,092 ऍक्टिव्ह केसेस आहेत.

भारत तिसऱ्या स्थानावर

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे यापूर्वी भारताची जागतिक क्रमवारीत खालच्या स्थानावर होता. मात्र, आता यामध्ये वाढ झाल्याने आता कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर गेला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

देशातील विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 2,67,665 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 6741 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच राज्यात 1,07,665 ऍक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 10695 रुग्णांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर 1,49,007 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कोरोना संबंधातील 10 महत्त्वाच्या ...

एक कोटीपेक्षा जास्त चाचण्या

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता वैद्यकीय यंत्रणाही तत्परतेने काम करत आहे. भारतात सध्या 1,20,92,503 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus India tally at 937487 and over 28000 new cases in 24 hours