Corona News : कोरोनाने पुन्हा टेन्शन वाढवलं! महिन्याभरात दहा मृत्यू; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलवली महत्वाची बैठक

कोरोना महामारीने पुन्हा एकदा देशात पाय पसरायला सुरूवात केली आहे.
Corona outbreak
Corona outbreak

कोरोना महामारीने पुन्हा एकदा देशात पाय पसरायला सुरूवात केली आहे. सिंगापूर, अमेरिका आणि चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाची रुग्ण वाढत असतानाच नवा व्हेरियंट जेएन-१ देखील आढळून आला आहे. केरळमध्ये या नवीन व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

दुसरीकडे कर्नाटक, सरकारकडून मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी २० डिसेंबर रोजी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक बोलवली आहे. दरम्यान केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार केरळमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मागील आठवड्यात तीन पट वाढली आहे.

केंद्रीय मंत्री मांडविया यांनी बोलवलेली ही बेठाक श्वसनासंबंधी आजारांमुळे वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेण्यासाठी बोलवण्यात आली आहे. २० डिसेंबर रोजी सर्व राज्यांचे आरोग्य मंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत. केरळ मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यासोबतच मृत्यूंमध्ये देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Corona outbreak
Ram Temple Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला आडवाणींना येऊ नका म्हणून सांगितलं; पण का? चंपत राय म्हणाले...

मीडिया रिपोर्टनुसार केंद्राने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत आठवडाभरात तिपटीने वाढ झाली आहे. तसेच १ ते १७ डिसेंबर दरम्यान १० मृत्यू झाले आहेत. सरकारकडून कोरोनाचा नवीन व्हेरियंट जेएन.१ बद्दल भीतीचे वातावरण आहे. हा सबव्हेरियंट केरळमधील एका ७९ वर्षीय महिलेत आढळून आला होता. हा कोरोनाचा सर्वात लेटेस्ट व्हेरियंट आहे. जो सिंगापूर, अमेरिका आणि चीनसह अनेक देशात वेगाने पसरत आहे.

Corona outbreak
Parliament Breach : घुसखोरी प्रकरणानंतर मोठा खुलासा! संसदेत सुरक्षा कर्मचाऱ्यांचं शॉर्टेज; 72 ऐवजी फक्त दहाच ऑफिसर

१६ डिसेंबर रोजी, केरळमध्ये ३०२ कोरोना नवीन प्रकरणे आढळली आहेत आणि चार जणांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. यापूर्वी १० डिसेंबर रोजी केरळमध्ये १०९ कोरोना रुग्ण तर १२ डिसेंबर रोजी २०० आढळले होते. त्यानंतर चारच दिवसात केरळमध्ये ३०० हून अधिक रुग्ण समोर आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com